Published On : Sat, Dec 16th, 2017

खेडी येथे धानाची गंजी आगीत भस्म

Advertisement


नागपूर/कन्हान: पासुन ७ कि मी लांब असलेल्या खेडी या गावातील अशोक दादाराव गावंडे या शेतकऱ्याची धान शेती प्रकाश पंजाबराव इंगळे यांनी ठेक्याने केली होती. पिकलेल्या धानाची कटाई करून ठेवलेल्या धानाच्या गंजीला आग लागल्याने धानाची गंजी आगीत भस्म होऊन शेतक-यांचे अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

या वर्षी धानाचा पिकाला वेळवर धरणाचे पाणी न मिळाल्यामुळे जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पडित राहली आहे. काही शेतकाऱ्यांनी परिवारांच्या पालनपोषणा करिता धैर्याने पाण्यासाठी पायपीट करून थोडया प्रमाणात धानाची लागवड केली. असेच खेडी येथील अपंग शेतकरी प्रकाश पंजाबराव इंगळे यांनी गावातील अशोक दादाराव गावंडे याची चार एकर धान शेती साठहजार रूपयाने एका वर्षांकरिता ठेक्याने करून हिम्मतीने कशीबशी सोय व काबाडकष्ट करून धान पीक पिकविले.तरीही पुन्हा शेतकऱ्या सोबत घात झाला.


ही धक्का दायक घटना शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०१७ च्या रात्री शेतात चार एकरातील धानाच्या कापून ठेवलेल्या गंजीला अचानक आग लागून धानाची गंजी आगीत भस्म झाली.अज्ञात इसमाने आग लावली असावी असा संशय व्यकत करण्यात येत आहे. प्रकाश इंगळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत ते अपंग असुन त्यांना आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, भाऊसुन, मुले घटनेमुळे सदर शेतकरी उध्दवस्त झाल्याने चिंतातुर असून या पुढे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे जीवन जगने असह्याय, कठीन होणार आहे. करीता शासनाने या आपत्ती च्या वेळी शेतक-यास तात्काळ आर्थिक मदत करून यातुन सावरण्याची संधी दयावी. अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी शेतकरी व गावक-याच्या वतीने केली आहे.