Published On : Mon, Oct 16th, 2017

शिवसेनेला आता हातावर नव्हे, गालावरच टाळी: राज ठाकरे

Advertisement


मुंबई: मनसेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेने नीच राजकारण केले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मनातील खदखद रविवारी व्यक्त केली. शिवसेनेला अनेकदा मी अप्रत्यक्षपणे मदत केली. मात्र यापुढे शिवसेनेला ‘टाळी’ देण्याचा विषयच नाही. आता फक्त गालावर टाळी दिली जाईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

मनसेचे नगरसेवक आपल्या संमतीनेच गेले, या शिवसेनेच्या प्रचाराचाही त्यांनी समाचार घेतला. शिवसेनेत प्रवेशासाठी प्रत्येक नगरसेवकाला ५ कोटी रुपये दिले गेले. हे ३० कोटी कुठून आले, असा सवालही केला.

अाशिष शेलार-राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर ‘गुफ्तगू’
मनसेचे सहा नगरसेवक आपल्या तंबूत आणून शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर डोळा ठेवून असलेल्या भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली अाहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात बैठक घेतल्यानंतर रविवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष अाशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

या दाेघांत पाऊण तास झालेल्या चर्चेत शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भांडूप पोटनिवडणुकीत विजयानंतर महापाैरपदाकडे ‘अागेकूच’ करणाऱ्या भाजपला शिवसेनेने दाेन दिवसांपूर्वी जाेरदार झटका दिला. मुंबई मनपात शिवसेना (८४) व भाजपच्या (८३) संख्याबळमध्ये अवघ्या एका जागेचा फरक राहिल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने थेट मनसेचे सहा नगरसेवक पक्षात घेऊन संख्याबळातील ही दरी अाणखी रुंद केली. शिवसेनेच्या या ‘षटकारा’ने केवळ मनसेच नव्हे तर भाजपही दुखावला.

या पार्श्वभूमीवर मुंबई मनपात सत्ताधारी शिवसेनेशी दाेन हात करण्यासाठी भाजप व मनसेची अनाेखी ‘मैत्री’ हाेणार असल्याचे राजकीय संकेत मिळत अाहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या ‘चाली’विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला हाेता. अाता परदेश दाैऱ्यावरून मुख्यमंत्री परतल्यानंतर भाजपच्या गाेटातील हालचालींना अाणखी वेग अाला अाहे.

मराठी मते फाेडून शिवसेनेला देणार शह
‘आता हातावर नाही, गालावर टाळी’ अशा शब्दांत शिवसेनेला धडा शिकवण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला अाहे. मनसेच्या या संतापाचा फायदा उचलत भविष्यामधील निवडणुकांमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार करण्याचा भाजपचा विचार असल्याचे समजते. मुंबई, ठाणे, कोकण या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेला ‘बळ’ देऊन मराठी मते शिवसेनेकडून मनसेकडे वळवण्याच्या हालचालींबाबत अाता भाजपकडून विचार केला जात अाहे,’ अशी माहितीही दाेन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली.