Published On : Wed, Dec 13th, 2017

ओरिंयटल कंपनीचा टोल वसुलीवर भर परंतु महामार्ग देखभालीकडे दुर्लक्ष

Advertisement


नागपुर/कन्हान: वर्धा रोड ते टेकाडी स्टाँप नागपूर बॉयपास व टेकाडी स्टाँप ते मनसर चारपदरी महामार्ग रस्ता ओरिंयटल व ब़ँकबॉन कंपनी व्दारे बीओटी तत्त्वावर कऱण्यात आले. असुन मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येत आहे. परंतु हा चारपदरी महामार्ग पुर्णत: सव्हीस रोडसह तयार करण्यात आला नसून साध्या देखभालीकडे सुध्दा ओरिंयटल कंपनी कडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे प्रवा़शांना व परिसरातील नागरिकांना अप़घाताचा त्रास सहन करावा लागत आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहर बायपास वर्धा रोड पासुन कन्हान नदी-टेकाडी बस स्टाफ ते मनसर पर्यंत चारप़दरी रस्ता बनविण्याचे काम ओरिंयटल व बँकबोन कम्पनी व्दारे करण्यात आले. यात परिसरातील शेतजमिनीचा बराच वापर झाला. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. अवघ्या दिड वर्षात या चारपदरी रस्त्याचे अपुरे काम करून टोल वसुली सुरू करण्यात आली. सर्व्हिस रस्ता अतिआवश्यक ठिकाणी तयार केला. परंतु अद्याप पर्यंत दोन्ही बाजूंनी संपुर्ण सर्व्हिस रस्ता तयार केला नाही. या रस्त्याच्या निर्माण कामात ज्या प्रमाणात झाडांची (वृक्षांची) कत्तल करण्यात आली. तेवढीच झाडेही या चारपदरी महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे पुर्ण लावलेही नाही व झाडे जगविण्याचा पुरेपुर प्रयत्नही कम्पनी व्दारे करण्यात आला नाही. बोरडा रोड, वराडा रोड, वाघोली रोड, केरडी रोड, डुमरी स्टेशन, शेती, फॉम ( साटक )रोड, आमडी फाटा, आमडी पटगोवारी या ठिकाणी ओव्हरब्रिज न बनविता अपघाताचे स्थळ बनविल्याने या चारपदरी महामार्गावर बहुतेक अपघात होऊन लोकांची प्राणहानी, शारिरीक अपंगत्वाचा त्रास प्रवाशाना भोगावे लागत आहे.


चारपदरी महामार्गावर हॉयमॉस लाईट प्रत्येक जोड व चौरस्त्यावर लावलेले नसुन जे काही लावलेले आहे तेही नियमीतपणे रात्रीला सुरू राहत नसल्यानेच अपघात व लुटमारीच्या प्रकार वाढतच आहे. रस्ता निर्माण कामात अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने गावाच्या बस स्टाप जवळील बोरवेल हँड पंप तोडण्यात आले. ते नविन बोरवेल हँड पंप अद्याप कंपनी व्दारे बनवुन देण्यात न आल्यानेच गावकरी व प्रवासाण्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने भयंकर त्रास सहन करावा लागतो. तसेच कुठे कुठे रस्त्यावर भेगा पडल्याने व रस्ता झिकझाक झाल्याने वाहन चालवताना चालकास त्रास होत असुन कधी कधी अपघातास ब़ळी पडावे लागते. यास्तव महामार्ग रस्ता बांधकाम करण्या-या कंपनीने टोल वसुली प्रमाणे महामार्ग रस्ता देखभाली कडे सुध्दा कटाक्षाने लक्ष देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.