Published On : Mon, Mar 27th, 2017

राणे हवेहवेसे व्यक्तिमत्त्व पण, भाजप प्रवेशाबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा: चंद्रकांत पाटिल

Advertisement


मुंबई:
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या भाजप किंवा शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, राणे असोत की माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतील, असे सांगत महसुलमंत्री चंद्रकांत पाटिल यांनी राणेंच्या पक्षांतराबाबतच्या कथीत चर्चेवरील संभ्रम कायम ठेवला.

दरम्यान, शिवसेनेच्या विरोधावर उपाय काढण्यासाठी भाजपच्या संपर्कात असलेल्या विवीध आमदारांचा भाजप प्रवेश करून सरकार मजबुत केले जाणार असल्याचीही चर्चा आहे. याकडे लक्ष वेधता आमचे संख्याबळ दोनशेपर्यंत आहे. तसेच, शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे. त्यामुळे सरकारही स्थिर आहे. त्यामुळे इतर पक्षांचे आमदार फोडण्यात आम्हाला अजिबात रस नाही. मात्र, जर कोणी स्वेच्छेने भाजपमध्ये प्रवेश करत असेल तर, त्यांचे स्वागत केले जाईल, असेही चंद्रकांतदांनी स्पष्ठ केले.

दरम्यान, पाडव्याचे निमंत्रण घेऊन भाजपचे मंत्री मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. याबाबतही चंद्रकांत पाटिल यांनी प्रतिक्रीया दिली. भाजप शिवसेनेची युती अभेद्य आहे, त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाडव्याचे निमंत्रण घेऊन जाण्याचा मुद्दाच निर्माण होत नाही, असे सांगत पाटील यांनी पाडवा निमंत्रणाच्या चर्चेला रविवारी बोलताना पूर्णविराम दिला. अशी चर्चा आहे. राणे असोत की माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.