Published On : Wed, Jun 3rd, 2015

नागपूर : दैनंदिन व्यवहारात सर्व नागरिकांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा – महापौर

Advertisement


पौर्णिमेच्या रात्री सावरकर चौक, खामला चौकात मनपा द्वारा उर्जा बचत अभियान महापौर प्रविण दटके च्या उपस्थितीत संपन्न

नागपूर। दैनंदिन व्यवहारात सर्व नागरिक व प्रतिष्ठानांनी अनावश्यक विजेचा वापर टाळून उर्जा बचत केल्यास पाण्याची व कोळशाची बचत होईल. तसेच त्यासोबत अर्थकारण व पर्यावरण हे आयाम जोडलेले असल्यामुळे उर्जा बचत हि संकल्पना चांगल्या प्रकारे पूर्ण होईल असा विश्वास महापौर प्रविण दटके यांनी व्यक्त केला.

महापौर प्रविण दटके पुढे म्हणाले कि हा उपक्रम या पुढेही दर पौर्णिमेला सुरु ठेवा शहरातील व वेगवेगळ्या भागात मोठ-मोठया चौकात उर्जा बचत कार्यक्रम राबवून जनजागृती करा. तरी लोकांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दर पौर्णिमेला रात्री उर्जा बचत अभियानाला स्वयं स्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आव्हाहन केले.

दर पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात रात्री ८ ते ९ दरम्यान विजेचे दिवे व उपकरणे बंद ठेऊन उर्जा बजत करण्याचे मनपा ने राबविलेल्या उपक्रमा अंतर्गत मंगळवार २ जून २०१५ रोजी पौर्णिमेच्या दिवशी रात्री सावरकर चौक, खामला चौका कडून छत्रपती चौक, प्रतापनगर रोड, पांडे ले-ऑउट खामलाकडे जाणारा मार्ग, वर्धा रोड, लक्ष्मीनगर चौकाकडे जाणारा मार्ग, अजनी चौकाकडे जाणारा मार्ग, त्रिमूर्तीनगर मार्ग, ऑरेंज सिटी मार्ग, सावरकर नगर चौक ते वर्धा रोड आदी भागातील रस्त्यावरील पथदिवे व होर्डिंग वरील दिवे बंद ठेऊन उर्जा बचत दिन राबविला.

यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती जयश्री वाढीभस्मे, कर आकारणी समिती चे सभापती गिरीश देशमुख, उपसत्ता पक्ष नेते मुन्ना यादव, ज्येष्ठ नगरसेवक गोपाल बोहरे, नगरसेवक प्रकाश तोतवानी, नगरसेविका पल्लवी शामकुले, उषा निशीतकर, निलिमा बावणे, अति. उपायुक्त जयंत दांडे गांवकर, सहा. आयुक्त गणेश राठोड, विद्युत उप अभियंता बुजाडे, दत्तात्र माटे, ग्रीन व्हीजन फाउंडेशन चे संचालक कौस्तुब चटर्जी, दक्षा बोरकर, विष्णू देव यादव, शीतल चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी स्वतः या अभियानात सहभागी होऊन मनपा अधिकारी कर्मचारी व  ग्रीन व्हीजन फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत थांबून नागरीकांशी व विविध प्रतिष्ठांशी संवाद साधून त्यांना उर्जा बचतीचे महत्व विशद केले. केवळ दर पौर्णिमेला रात्री उर्जा बचत करण्या सोबतच दैनंदिन व्यवहारात देखील आपले घरी, प्रतिष्ठान, कार्यालयात अनावश्यक विजेची दिवे व विजेची उपकरणे बंद ठेऊन उर्जा बचतीस सहकार्य करावे असे आवाहन महापौर प्रविण दटके ने शहरातील जनतेला केले.

एक युनिट विजेच्या निर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा, ७.५ लिटर पाणी खर्च होतो व १००० ग्रॅम कार्बनडाय ओक्साइड वायूचे उत्सर्जन होते. त्यामुळे विज वाचवा, पृथ्वी वाचवा व पौर्णिमा दिवस साजरा करा असेही हि आवाहन महापौर प्रविण दटके ने यावेळी केले.

महापौर प्रविण दटके, सभापती जयश्री वाढीभस्मे, गिरीश देशमुख,  गोपाल बोहरे, प्रकाश तोतवानी, पल्लवी शामकुले, उषा निशीतकर, यांनी ग्रीन व्हीजन फाउंडेशन चे संचालक कौस्तुब चटर्जी व कार्यकर्त्या समवेत विद्युत दिवे व उपकरणे बंद करण्यासाठी फिरले. सावरकर चौकातील चारही बाजूला जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गवरील दुकानदारांनी, हॉटेल  व प्रतिष्ठानी रस्त्यावरील दुकानदारांनी आपल्या दुकानातील अनावश्यक दिवे व अन्य उपकरणे बंद ठेऊन उर्जा बचत अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. तसेच चौकातील मोठमोठया होर्डिंग वरील दिवे मालवून टाकण्यात आले होते. त्याचप्रमाणे शहरातील मनपा च्या १० हि झोन अंतर्गत विज बचत अभियान राबविण्यात आले. जनतेनी प्रतिसाद देवून सुमारे २७४९.०० किलो व्हाट युनिट विज बचत केली. यावेळी महापौर प्रविण दटके विज बचत अभियानाला शहरातील जनतेनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेने आभार मानले.

यावेळी सहा. अभियंता सलीम इकबाल, मनपा चे अभियोक्ता एड. व्हि. डी. कपले, विद्युत अभियंता गजेंद्र तारापुरे, ग्रीन व्हीजन फाउंडेशन चे कार्यकर्ता दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, राजन गंगवानी, लाला रखनानी, शितल चौधरी, बी. डी. यादव, विश्वजीत पाईकराव, ईश्वर भोसकर, कल्याणी वैद्य, निलेश मुघाटे, आकाश शेंडे, राजन रामचंदानी, नारायण भोजवाणी, सुनील नवघरे, मोहन वाडीभस्मे समेत ग्रीन व्हीजन फाउंडेशन चे अनेक कार्यकर्ता, गणमान्य नागरिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.