Published On : Tue, Sep 26th, 2017

कोराडी मंदिरात महावितरणचा स्टॉल

Advertisement

नागपूर: महावितरणच्या वतीने कोराडी येथील जगदंम्बा देवी मंदिर संकुल परिसरात महावितरणच्या उपक्रमाची माहिती जनतेला देण्यासाठी स्टॉल लावण्यात आला आहे. पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्टॉलला भेट देऊन महावितरणच्या उपक्रमाचे कौतुक केले.

महावितरण मोबाईल अँपची कार्य प्रणाली जाणून घेण्यासाठी वीज ग्राहकांनी उत्सुकता दाखवली आहे. महावितरण मोबाईल अँपच्या माध्यमातून वीज देयक भरणे, विजेची तक्रार करणे, जुन्या देयकाची माहिती आणि ते कधी भरले याची माहिती ग्राहकाला मिळते आहे. या शिवाय ऑनलाईन पद्धतीचा वापर करून बिल कसे भरावे याचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दाखवल्या जात आहे. विजेपासून होणारे वाढते अपघात कसे टाळावे या सह महावितरणच्या अन्य ग्राहक उपयोगी सेवेची माहिती येथे दिल्या जात आहे.

मुख्य अभियंता श्री. रफिक शेख,अधीक्षक अभियंता श्री नारायण आमझरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता श्री डी.एन. साळी , उपकार्यकारी अभियंता खापरखेडा श्री टेम्बेकर,कोराडी शाखा अभियंता मुंगसे आणि जनमित्र ग्राहकांना मार्गदर्शन करीत आहेत.