Published On : Wed, Sep 13th, 2017

ऊर्जामंत्र्यांनी ऐकल्या शेकडो वीज तक्रारी; हजोरोंशी साधला सुसंवाद

Advertisement

नाशिकः नाशिक येथे झालेल्या वीज ग्राहकांशी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज ग्राहकांच्या जवळपास ४०० ते ४५० तक्रारी ऐकून घेत त्या जागेवरच निकाली काढल्या. धोरणात्मक विषयाशी निगडित प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ऊर्जामंत्र्यांनी सलग सहा तास वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकत सुसंवाद साधला.

नाशिक जिल्ह्यातील वीज ग्राहकांशी थेट संवाद कार्यक्रमात अगदी सामन्यातील सामान्य वीज ग्राहकांसह जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच, इतर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. नाशिकच्या सुजान नागरिकांनी वैयक्तिक प्रश्नांपेक्षा सार्वजनिक प्रश्नांवर मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधल्याने ऊर्जामंत्र्यांनी नाशिककरांचे कौतुक केले. ऊर्जामंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती.

नाशिक जिल्ह्यात बागायती क्षेत्र मोठे असल्याने अनेक नागरिक शेत-शिवरामध्ये वास्तवात वास्तव्यास असतात. त्यांच्या घरात कायम प्रकाश उपलब्ध झाला पाहिजे, याच्यासाठी विशेष रोहित्र (एसडीटी) तसेच सिंगल फेज वीज व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना एका प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी दिल्या. यासाठी जिल्ह्याला दोन कोटी ३१ लाख उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय येवला तालुक्यात मागील काही वर्षांपूर्वी महावितरण आपल्या दारी योजनेतील सहा हजार ७०० शेतकरी वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास तात्काळ पाठवून संबंधित शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री ना. श्री. दादाजी भुसे, नाशिक मनपाच्या महापौर सौ. रंजनाताई भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शितलताई सांगळे, आमदार श्री. बाळासाहेब सानप, आमदार श्री जयंतराव जाधव, आमदार डॉ. श्री. अपूर्व हिरे, आमदार सीमाताई हिरे, उपमहापौर एस. जी. गीते, सभापती श्री. शिवाजी गांगुर्डे, महापारेषणचे संचालक श्री. गणपतराव मुंडे, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे संचालक श्री. सतीश करपे, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री पी. एस. पाटील, मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मुख्य अभियंता श्री जयंत विके यांच्यासह महावितरण, महापारेषणचे अधिकारी, जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आलेले वीज ग्राहक उपस्थित होते.

फोटोओळ – इच्छामणी मंगल कार्यालयात आयोजित वीज ग्राहकांशी थेट संवाद कार्यक्रमात वीज ग्राहकांशी संवाद साधतांना ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे. समवेत महापौर सौ. रंजनाताई भानसी, जिप अध्यक्ष शितलताई सांगळे, आमदार श्री. बाळासाहेब सानप, आमदार श्री जयंतराव जाधव, आमदार डॉ. श्री. अपूर्व हिरे, आमदार सीमाताई हिरे, महापारेषणचे संचालक श्री. गणपतराव मुंडे, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. पी. एस. पाटील. मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर आदी.