Published On : Thu, Jul 23rd, 2015

बुलढाणा (खामगांव) : राेतीचा वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले

Advertisement

रॉयल्टीवर खोडतोड; चालकाचा तहसीलदारांशी वाद 

RETI VAHTUK
खामगांव (बुलढाणा)।
शहरातून रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदारांनी बुधवार दुपारी 12 वाजेदरम्यान रेल्वेस्टेशन समोर पकडले. यावेळी चालकाजवळ रेटीच्या रॉयल्टीवार खोडतोड दिसून आल्याने तहसीलदारांनी त्यांना वाहन तहसील कार्यालयात लावण्याचे सांगितले. परंतु चालकांनी रस्त्यावरच गाडी उभी करून तहसीलदारांशी वाद घातल्याने काहीकाळ ट्रॅफिक जाम झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार आकाश लिगाडे हे त्यांच्या पथकासह शेगावकडे जात असताना त्यांना रेल्वेस्टेशन समोरून एमएच 28 एबी 7663 व एमएच 28 एबी 7412 या क्रमांकाचे दोन आयशर ट्रक रेतीची वाहतूक करतांना दिसून आले. यावेळी तहसीलदार यांनी सदर ट्रकांना थांबवून त्यांच्याजवळील रॉयल्टीची पाहणी केली. दरम्यान दोघांच्या रॉयल्टीवर तारखांची खोडतोड दिसून आल्याने तहसीलदारांनी दोन्ही ट्रक चालकांना त्यांची वाहन तहसीलला लावण्याचे सांगितले. यापैकी एमएच 28 एबी 7412 चा वाहनचालक नजीर खान अमउल्लाखान रा. नन्दुरा याने त्याचे वाहन तहसील कार्यालयात लावले. परंतु दुसरा चालक संजय दयाराम गावंडे रा. निमगाव याने त्याच्या ताब्यातील ट्रक तहसील कार्यालयाला न लावता भर रस्त्यावरच उभा करून तहसीलदारांशी हुज्जतबाजी केली. यामुळे कही काळ रास्ता जाम झाला होता. यावेळी तहसीलदारांनी तातडीने शहर पोस्टेला फोन करून चालकास पोस्टेला आणले. वृत्त लिहेपर्यंत कार्रवाई सुरु होती.