Published On : Sun, Aug 20th, 2017

नागपूर विभागात सरासरी 52.51 मिमी पाऊस

Advertisement


नागपूर: नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 52.51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सर्वाधिक 151.20 मि.मी., कामठी तालुक्यात 142.60 मि.मी., नागपूर (शहरी व ग्रामीण) भागात 141.90 मि.मी., मौदा तालुक्यात 137.00 मि.मी., पारशिवनी तालुक्यात 117.30 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात 104.20 मि.मी., पवनी तालुक्यात 85.40 मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात 117.40 मि.मी., गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 71.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.

नागपूर 99.99 (581.53), गडचिरोली 39.05 (613.50), गोंदिया 29.13 (547.58), भंडारा 66.80 ( 575.46), चंद्रपूर 37.08 (502.48) तर वर्धा 43.00 ( 515.26) पाऊस झाला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

नागपूर विभागात दिनांक 1 जून ते 19 ऑगस्ट 2017 पर्यंत सरासरी 555.97 मि. मी. पाऊस पडला आहे.